Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले सोनगीर (धुळे )

 किल्ले सोनगीर (धुळे )

सह्याद्री नावाच्या डोंगरावर अनेक किल्ले आहेत. सह्याद्रीचा एक भाग धुळे जिल्ह्यात जातो. धुळे-आग्रा महामार्गावर सोनगीर आणि लालिंग असे दोन किल्ले आहेत. सोनगीर हे धुळ्यापासून २१ किमी अंतरावर आहे.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 
किल्ल्याची ऊंची : १००० फूट / ३०५ मीटर 
डोंगररांग : गाळणा टेकड्या 
जिल्हा : धुळे 
श्रेणी : अत्यंत सोपी 

गडावर जाण्याच्या वाटा: 

सोनगीर किल्ला हा धुळ्यापासून २१ किमी. अंतरावर आहे. धुळे-आग्रा रस्त्यावर सोनगीर नावाचा फाटा लागतो. या फाट्यावरच सोनगीर नावाचे गाव आहे. धुळेहून शिरपूरमार्गे जाणाऱ्या किंवा शहादा, दोंडाईचा अशा कोणत्याही मार्गाने जाणाऱ्या एसटीने सोनगीर फाट्यावर उतरावे. या फाट्यावरून साधारण १० मिनिटांत सोनगीर गावात पोहोचायचे. गावातून ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोरूनच एक छोटीशी वाट गडावर जाते. सोनगीर गावातून गडावर जाण्यास १० मिनिटे लागतात. गडावर जाणारी ही एकमेव वाट आहे

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही 
जेवणाची सोय : सोनगिर फाट्यावर जेवनाची सोय होऊ शकते 
पाण्याची सोय : गडावर   पिण्याचे पाणी नाही 
पायथ्याचे गाव: सोनगिर 
वैशिष्ट्य : सोनगिर किल्ल्यावरील विहीर व त्याच्या बाजूला असलेली शाही हमाम खाण्या सारखी रचना असलेली उद्ध्वस्त वास्तु वैशिष्ट्यपूर्ण आहे .



Post a Comment

0 Comments